बेळगावला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

१९ डिसेंबर २०२२


बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सीमावाद, त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन महत्त्वाचे मानले जात आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधा येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे आहे. ३० डिसेंबरपर्यंतचे १० दिवसांचे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अनेक मुद्द्यांवर एकमेकांवर हल्ला आणि प्रतिवाद करताना दिसत आहेत.

महाराष्ट्र एकिकरण समितीचं महाअधिवेशनदेखील बेळगावात आयोजित करण्यात आलं आहे. या अधिवेशनाला शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने जाणार होते. मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आलाय. पण महाविकास आघाडीने आक्रमकता दाखवत बेळगावात जाण्याचा निर्णय घेतला आहे.बेळगावात मविआचे नेते आणि कार्यकर्ते जाणार असल्याने कर्नाटक सीमेवर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत कर्नाटकच्या पोलिसांचा ताफा तैनात आहे. तर सीमेवर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीसदेखील सज्ज आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *