पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी आज रस्त्यावर

१९ डिसेंबर २०२२

पुणे


विविध मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

नवीन पॅटर्न २०२५ ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या २ संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते २०२५ साठी तयारी करतील परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. यासंदर्भात शासनाने विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *