‘आनंदाचा शिधा’ दिवाळी संपली तरी अद्याप हा शिधा लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही

०४ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने शिधापत्रिकाधारकांना ‘ आनंदाचा शिधा ‘ वितरित करण्याचा निर्णय घेतला . मात्र , दिवाळी संपली तरी अद्याप हा शिधा लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही . ज्याठिकाणी उपलब्ध झाला आहे , त्याठिकाणी काही राजकीय मंडळीनी चमकोगिरी सुरू केली आहे . शिधा शासनाचा , १०० रुपये लोकांचे आणि वाटप मात्र दुकानदारांऐवजी राजकीय मंडळी करत असल्याचे सर्रास चित्र पाहायला मिळत आहे . यावरून राजकीय मंडळींविरोधात नागरिक व दुकानदारांमध्ये संताप आहे. शिंदे सरकारने मोठा गाजावाजा करत १०० रुपयात ‘ आनंदाचा शिधा किराणा किट वाटपाची घोषणा केली. पण दिवाळीपूर्वी हा शिधा रास्त भाव दुकानांकडे आलाच नाही . त्याविरोधात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले होते . त्यानंतर केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदार संघातच शिधा पोचलेला दिसून येत आहे.

आता त्यांच्या नात्यागोत्यातील मंडळी तोऱ्यात उपस्थित राहून शिधा वाटप करत आहे . लाभार्थी पिशवी आणि शंभर रुपये घेऊन सकाळपासून रांगेत थांबलेले असतात . मात्र , राजकीय मंडळी आल्याशिवाय दुकानदार शिधा वाटपाला सुरूवात देखील करत नसल्याची वस्तुस्थिती आहे . स्वतः खर्च करून शिधा देत असल्याच्या आविर्भावात माजी आमदार , काही नगरसेवक आणि नगरसेविका सकाळीच दुकानांवर हजेरी लावत आहेत आणि स्वहस्ते लाभार्थ्यांना वाटप करत असल्याचे चित्र सर्वत्र आहे . शिधावाटप करण्यात अडथळ्यांची शर्यत शहरात एक लाख २० हजार शिधापत्रिकाधारक आहेत . त्यांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा पोहोचविण्याचे प्रयत्न राज्य सरकारने सुरू आहेत . पण अद्याप शहरात ६० टक्के लोकांना शिधा मिळालेला नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *