तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गुंजाळवाडी विद्यालयाचे घवघवीत यश

मंगेश शेळके 
१६ डिसेंबर २०२२

ओझर


जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद पुणे गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिर नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. त्यात ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव चे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी शाळेतील खेळाडूंनी घवघवीत असे यश संपादन केले. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोर्हाडे आर. बी.यांनी दिली. यामध्ये १४ वर्षे वयोगट मुले उंच उडी मध्ये काशीद अथर्व प्रथम ,शिंदे आर्यन युवराज द्वितीय , १७ वर्षे वयोगट मुले ढवळे अजिंक्य उंच उडी तृतीय ,कानडे आर्यन लांब उडी तृतीय , त्याचप्रमाणे ४१०० मध्ये शिंदे आर्यन ,कानडे आर्यन ,अथर्व काशीद ,सोलंकी साई, शिंदे साई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला . तर थाळी फेक मध्ये अथर्व सरवदे यांने द्वितीय क्रमांक पटकाविला.

तसेच १४ वर्षे मुली या वयोगटात उंच उडीत तन्वी शिंदे प्रथम ,१७ सतरा वर्षे वयोगट उंच उडीत साक्षी सोलाट द्वितीय तर १९ वर्षे वयोगट उंचवडीत वायकर उत्कर्षा व अंजली कानडे तृतीय , १७ वर्षे वयोगट तिहेरी उडी मध्ये द्वितीय क्रमांक संकष्टी सोलर तर १७ वर्षे वयोगट भालाफेक मध्ये शिंदे सानिका तृतीय , १९ वर्षे वयोगटात भालाफेक मध्ये जेडगुले सृष्टी द्वितीय व ४१०० मध्ये द्वितीय असे घवघवीत यश विद्यालयाच्या मुले व मुलांनी संपादन केले. सर्व यशस्वी खेळाडूंना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बोर्हाडे आर.बी. व क्रीडा शिक्षक कानडे ए.बी. यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे ,कार्याध्यक्ष कृषी रत्न अनिल तात्या मेहेर ,उपाध्यक्ष सुजित खैरे ,कार्यवाह रवींद्र पारगावकर , विद्यालयाचे चेअरमन अल्हाद खैरे, गुंजाळवाडी गावच्या विद्यमान सरपंच स्मिताताई बेलवटे, उपसरपंच धर्मेंद्र डोंगरे आदी मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *