राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढ; नवनीत राणा व रवी राणा यांच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट

१६ डिसेंबर २०२२


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या घोषणेने कायदा-सुव्यवस्था निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई होत असताना पोलिसांना कर्तव्य करण्यापासून रोखले, या आरोपाखाली दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीला अपक्ष खासदार नवनीत राणा व अपक्ष आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा विशेष न्यायालयात उपस्थिती टाळली. त्यामुळे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी करून त्यांना आता १० जानेवारी २०२३ रोजी सुनावणीला हजर राहण्याचा आदेश दिला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *