पिंगळवाडी येथे नवरदेव ,लग्नकार्यमालक यांचेसह डी.जे मालक व ऑपरेटर यांचेवर विनापरवाना वरात काढली म्हणून गुन्हा दाखल.| घोडेगाव पोलिस स्टेशनची धडक कारवाई

घोडेगाव – आंबेगाव ब्युरोचिफ मोसीन काठेवाडी
आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पिंगळवाडी गाव येथे  रोहीदास  देवराम खुटाण यांचे घराचे जवळील मोकळ्या जागेत विनापरवाना वरात काढली म्हणून नवरदेव , लग्नकार्यमालक यांचे सह डीजे मालक व ऑपरेटर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
लग्नाच्या वराती निमित्त मानवी जिवीतास धोकादायक असलेल्या  कोरोना या विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची जाणीव असतानाही विनामास्क , सोशल डिस्टन्सचे पालन न करता अंदाजे १५० ते २०० लोक जमवुन वेळेचे बंधन न पाळता विनापरवाना डी.जे सिस्टीमवर मोठया व कर्कश आवाजात गाणी वाजवुन मा. सर्वोच्च न्यायालयाचे अटी व शर्तीचे उल्लंघन करत मिळुन आल्याने1)रोहीदास देवराम खुटाण (लग्न कार्यमालक)2) गणेश रोहीदास खुटाण(नवरदेव) दोघे रा. पिंगऴवाडी ता. आंबेगाव जि.पुणे 3) विशाल नारायण बो-हाडे  4)गणेश सदाशिव फलके दोघे रा.आमोंडी बो-हाडे मऴा ता.आंबेगाव जि. पुणे यांच्यावर भा.द.वी कलम १८८ ,२६९ ,२७०,३४ प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल अमोल मनोहर काऴे यांच्या  फिर्याद वरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास  अंमलदार- पो.ना एस. एम. लांडे ब.नं 2074 करत आहे.