उज्ज्वला गॅस योजनेची महिला कॉंग्रेसने केली पोलखोल

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ जानेवारी २०२२

पिंपरी


युपीए सरकारच्या काळात चारशे रुपयाला मिळणारा घरगुती गॅस भाजपच्या मोदी सरकारने एक हजार रुपयांपेक्षा जास्त महाग केला आहे. उज्ज्वला गॅस योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान मागील दोन वर्षांपासून बंद केले असून यासाठी वापरण्यात येणा-या संगणक प्रणालीमध्ये बदल करुन हजारो कोटींचा भ्रष्टाचार केंद्र सरकारने केला आहे. याची पोलखोल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केली आहे. भ्रष्टाचारी सरकारने महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सायली किरण नढे यांनी केली.

गॅस दरवाढ करणा-या केंद्र सरकारचा तीव्र निषेध : सायली नढे

रविवारी (दि. १६ जानेवारी) पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात नढे यांच्या नेतृत्वाखाली शहर कॉंग्रेसच्या महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेचे अनुदान केंद्र सरकारला संक्रांतीचा वान म्हणून परत केले आणि केंद्र सरकारचा निषेध करीत घोषणा दिल्या. यावेळी स्वाती शिंदे, छायाताई देसले, नंदाताई तुळसे, सुप्रिया पोहरे, निर्मला खैरे, निगार बारसकर, रचना गायकवाड, वैशाली गोडसे, भारती घाग, सुवर्णा कदम, सुनिता जाधव, सुनिता कुसाळकर, सुनिता गिरी, संगिता दिवाण, कस्तुराबाई जाधव, विमल खंडागळे, कुसूम वाघमारे, शितल सिकंदर, आशाबी शेख, गंगा नाईक, जना सुर्यवंशी, अनिता बग्गे, अर्चना सुर्यवंशी, नीलम सुर्यवंशी, शीला थोरात, राधा गायकवाड, आशा भोसले, राणी राठोड, अनिता डोळस, सपना गायकवाड, मनोरमा रोकडे आदींसह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. यावेळी सायली नढे यांची महिला काँग्रेसची शहराध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचे हे पहिलेच जाहिर आंदोलन होते. नढे यांच्या निवडीला कॉंग्रेस पक्षातील सर्वच जुन्या, नव्या महिला, युवतींनी उपस्थित राहुन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी स्वाती शिंदे, छायाताई देसले, नंदाताई तुळसे, निर्मला खैरे आदींनीही केंद्र सरकारचा निषेध करणारे भाषण केले.

यावेळी सायली नढे पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरीकांच्या पैशांची लुट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छबी वापरुन उज्ज्वला गॅस योजनेची फसवी जाहिरात केली. या योजने विषयी ‘कॅग’ ने गंभीर आक्षेप घेतले आहे. या आक्षेपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अद्यापही का खुलासा केला नाही असा प्रश्न देशभरातील महिला विचारत आहेत. या योजनेच्या संगणक प्रणालीमध्ये फेरफार करुन अनेक कुटूंबांना एकापेक्षा जास्त कनेक्शन दिले आहेत. एक कोटी साठ लाख कनेक्शन फक्त आधारकार्डवर दिले आहे. तर एैंशी हजार कनेक्शन अठरा वर्षे कमी वयाच्या व्यक्तींना दिले आहेत. तर यातील आठ लाखांहून जास्त कनेक्शन अल्पवयीनांना दिले आहेत. हि योजना फक्त महिलांसाठी असून १ लाख ८८ लाख हजार कनेक्शन पुरुषांच्या नावे दिले आहेत. या योजनेत मिळणारा सिलेंडर ८५० रुपयांना आहे तर अनुदान अवघे ३५ रुपये आहे ते देखिल मागील दोन वर्षांपासून दिले जात नाही. फसवी जाहिरातबाजी करुन महागाई वाढ करणा-या या भाजप प्रणित मोदी सरकारचा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत असेही सायली नढे म्हणाल्या. सुत्रसंचालन नंदाताई तुळसे आणि आभार भारतीताई घाग यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *