अडीच तासात चोरट्यांनी २०५ तोळे सोनं केलं लंपास

१४ डिसेंबर २०२२

पुणे


घरातील व्यक्ती जेवणासाठी बाहेर गेल्यानंतर अवघ्या अडीच तासांत चोरट्यांनी एका व्यवसायिकाचे घर साफ करून तब्बल ६६ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यामध्ये २०५ तोळे सोने, चार तोळे हिऱ्याचे दागिने, चांदी, प्लॅटीनमचे दागिने, रोकड आणि विदेशी चलनाचा समावेश आहे. ही घटना भरदिवसा रविवारी (दि. ११) दुपारी बाणेर रोड औंध येथील अनामिका बंगला क्रमांक १७ सिंध हौसिंग सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यवसायिकाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे व्यवसायिक असून, त्यांचा पिंपरी एमआयडीसीत प्रिंटींग आणि पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. रविवारी दुपारी दिड वाजता ते आपल्या कुटूंबियासोबत जेवणासाठी बाहेर गेले होते. तर त्यांची कामवाली बाई देखील तिच्या घरी गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा पाठीमागील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरुमधील कपाटातील व लॉकरमधील ६६ लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *