चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी १० पोलिसांचे निलंबन मागे

१४ डिसेंबर २०२२


भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणी निलंबित झालेले १० पोलीस पुन्हा सेवेत रुजू होणार आहेत. ३ पोलीस अधिकारी आणि ७ पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होते. या सर्वांवर शिस्तभंगाचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलं होतं. मात्र विरोधकांचा दबाव वाढल्यानं या १० पोलीस पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आलं आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर हत्या करण्याचा गुन्हा दाखल केला गेला. कलम ३०७ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच १0 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.यावर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता या पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रूजू करून घेण्यात आलं आहे.