अनैतिक संबंधातून खून झालेल्या इसमाच्या पत्नीला देखील केले अटक

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)


 

खूनाच्या कटामध्ये पत्नीचाही समावेश

नारायणगाव (तालुका जुन्नर) येथे मागील आठवड्यात एका युवकाच्या झालेल्या खूनाच्या कटामध्ये खून झालेल्या इसमाच्या पत्नीला देखील अटक करण्यात आली आहे.
येथील पुणे नाशिक बाह्यवळण रस्त्याजवळील तेल ओढ्याच्या वरच्या बाजूला पडीक जमिनीवर खोडद रस्त्यालगत गुरुवार दिनांक २५ मे रोजी रात्री साहेबराव नामदेव भुतांबरे याचा खून झाल्याची घटना घडली.
या प्रकरणी
खून झाल्यानंतर चोवीस तासाच्या आत दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्याच्या पत्नीला देखील नारायणगाव पोलिसांनी ३१ मे रोजी अटक केली आहे .
स्वतःच्याच नवऱ्याच्या खूनाच्या कटामध्ये सहभाग असलेल्या सविता साहेबराव भूतांबरे (रा. नारायणवाडी, वय ४०) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानुसार, यातील मयत साहेबराव भुतांबरे यांची पत्नी सविता साहेबराव भूतांबरे हिचे या घटनेतील आरोपी बंटी उर्फ प्रमिल गंगाराम खरमाळे याचे सोबत अनैतिक संबंध होते, या संबंधात मयत साहेबराव याचा अडथळा होत असल्याने यातील दोन्ही आरोपी व सविता भुतांबरे यांनी कट कारस्थान करून मयतास जिवे ठार मारले. त्यामुळे या गुन्ह्यात भा.द.वि. कलम १२० ब या कलमाची वाढ करून यातील महिला आरोपी सविता साहेबराव भूतांबरे हिला अटक करण्यात आली आहे. तिला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर या महिला आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *