जयहिंद शैक्षणिक संकुलात २७५ विद्यार्थ्यांचे लसीकरण

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
०८ जानेवारी २०२२

नारायणगांव


कुरण (ता. जुन्नर) येथील जयहिंद शैक्षणिक संकुलामध्ये २७५ विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. दि. ०७ व ०८ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगांव मार्फत १५ ते १८ वर्ष वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लसीकरण मोहिम आयोजित करण्यात आली होती. जयहिंद इंटरनॅशनल स्कुल, ज्युनियर कॉलेज व जयहिंद तंत्रनिकेतन कुरण या दोन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. विद्यार्थ्यांनी लसीकरणाला घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे कारण लसीकरणामुळे कोरोना संसर्गाचा होणारा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. सध्या कोरोना संसर्ग झपाट्याने होत असून दिवसांगणीक रूग्णसंख्या वाढत असल्याने सर्वच विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन केल्याने निश्चितच आपण कोरोना संसर्गाच्या साखळीला प्रतिबंध करू शकतो असे मत जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना लसीकरणास प्रोत्साहन देताना व्यक्त केले.


यावेळी जुन्नर पर्यटन संस्थेचे मनोज हाडवळे, जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या संचालिका शुभांगी गुंजाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी.एस.गल्हे, प्राचार्य योगेश गुंजाळ, डॉ. किरण पैठणकर शैक्षणिक समन्वयक प्रा. स्वप्निल पोखरकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगांचे आरोग्य अधिकारी डॉ. एम.बी.भोर, आरोग्य कर्मचारी दिलीप कचरे, आरोग्य सेविका श्रीमती गोसावी, पाचपुते आरोग्य सहाय्यक व सेवक यांनी या लसीकरणाचे नियोजन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *