खंडाळा घाटात विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

१२ डिसेंबर २०२२


खंडाळा घाटात एका विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ४८ विद्यार्थी होते. यातले अनेक ३५ जण जखमी असून ११ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चेंबूर येथील एका खाजगी क्लासचे विद्यार्थी प्रवासी बसमधून लोणावळ्यातील वेट अँन्ड जॉय येथे आले होते. परतीच्या प्रवासात असताना खंडाळा घाटातील वळणावर हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती समजताच बोरघाट व खंडाळा महामार्ग पोलीस, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामजिक संस्थेचे कार्यकर्ते व इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सर्व जखमी मुला मुलींना एम. जी. एम. रुग्णालयासह अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *