शिंदेवाडीच्या वीर जवानाचे गावात स्मारक उभारणार – आमदार अतुल बेनके

रामदास सांगळे
विभागीय संपादक 
१९ जानेवारी २०२२

बेल्हे


आमदार अतुल बेनके यांनी वाहिली श्रद्धांजली

रेल्वे अपघातात वीरमरण आलेल्या शिंदेवाडी (ता.जुन्नर) येथील शशिकांत शिंदे या जवानाला तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. तालुक्यातील एक जवान गेल्यामुळे तालुका पोरका झाला आहे तसेच या कुटुंबाच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभा असणारा असल्याचेही आमदार बेनके यांनी सांगितले. तसेच शशिकांत शिंदे यांच्या स्मरणार्थ शिंदेवाडी गावातील मुख्य चौकात त्यांचे स्मारक उभारले जाणार असल्याचे सांगितले.

 

त्यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, कात्रज दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब खिलारी, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धोंडीभाऊ पिंगट, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते,माजी सरपंच रोहिदास शिंदे,ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई-वडील, भाऊ असा त्यांचा परिवार आहे. शेतकरी व गरीब कुटुंबतील या जवानाच्या मृत्यूने शिंदे कुटुंबावर शोककळा पसरली असून सर्वत्र दुःखाचं वातावरण आहे. या वीर जवानावर गावात मंगळवार (दि.१८) रोजी शोकाकुल वातावरणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *