सर्व शिवभोजन थाळी केंद्र GPS द्वारे जोडावे यासाठी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि ३१ मे २०२१
आज महाराष्ट्रात ९८० ठिकाणी शिवभोजन थाळी केंद्र सुरु आहेत. या कोरोना काळात ४ कोटी कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर आणि इतर गरजूंनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. काही केंद्रांवर गर्दी तर काही केंद्र कुणाला माहित नसल्यामुळे कोणीही नसते.अजूनही ही सेवा अनेक गरजूपर्यंत पोहोचली पाहिजे. हा धागा पकडून पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील यांनी थेट राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले.ते पात्र त्यांनी समाज माध्यमातून पाठवले आहे.

त्यात माधव पाटील असे म्हणतात की,आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यात इंटरनेट आहे. या सर्व शिवभोजन थाळी केंद्रांना इंटरनेटच्या GPS मार्फत जोडावे. याने गुगलवर “शिवभोजन थाळी Near me ” असे शोधले तर जवळच्या शिवभोजन थाळी केंद्राचे ठिकाण दिसेल. यामुळे नागरिक/समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांना कोणी गरजू दिसले तर ते त्यांना जवळचे शिवभोजन थाळी केंद्र सांगतील किंवा तिथे पोहोचवतील. सुजाण नागरिक गरजू नागरिकांना मदत करतील. आधीच जागतिक भूक निर्देशांक २०२० मध्ये भारत ९४ व्या स्थानी आहे. तंत्रज्ञानाचा वापर माणूस माणसाला, पोटाला जोडण्यासाठी करेल. केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठीही GPS या तंत्रज्ञानाचा आणि ‘शिवभोजन थाळी अँप’ चा वापर होईल असे माधव पाटील म्हणाले.

तंत्रज्ञानाच्या पातळीवरून ही योजना खाली झिरपली तर त्याचा फायदा अनेक गरजूंना नक्कीच होऊ शकतो. तरी आपण महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र सरकारसोबत समन्वय साधून सर्व शिवभोजन थाळी केंद्रांना इंटरनेटच्या GPS मार्फत जोडण्यासाठी आणि अँपसाठी पाऊले उचलावीत ही विनंती ट्विटर माध्यमामार्फत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *