शाईफेक प्रकरणानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ

१२ डिसेंबर २०२२


भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. त्यांच्या पुण्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.

याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलं आहे. शाईफेकीचा हा कट पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला होता.

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणात ११ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ८ पोलिस कर्मचारी आहेत. तर यामध्ये ३ पोलिस अधिकारी आहेत. कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *