पुण्यात नायजेरीयन व्यक्तीकडून सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त

१० डिसेंबर २०२२

पुणे


नायजेरियन व्यक्तीला ‘कोकेन’ या अमली पदार्थाची विक्री केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली. या नायजेरियन व्यक्तीकडून २ कोटी २० लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. फॉलरिन अब्दुल अजीज अंडोई (वय ५०, रा. शकुंतला कानडे पार्क, उंड्री, मूळ नायजेरिया) अशी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाॅलरिन हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे. एक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून कोकेन, इलेक्ट्राॅनिक काटे, कार, सहा मोबाईल असा एकूण २ कोटी २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१९ मध्ये पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत कोकेन विक्री केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *