राज्यमंत्री बच्चू भाऊ कडु यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घोडेगाव येथे कोविड योद्धाचा सन्मान करत राबवला समाजउपयोगी उपक्रम…

घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी  
लोकनेते नामदार श्री बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त , ठिकठिकाणी पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने ५ जुलै ते १५ जुलै मदत सप्ताह जाहीर करण्यात आला होता. याचेच औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील गोर- गरीब शेतकरी ,तसेच आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील कुटुंबाला घरावरील पत्रे भेट तसेच पळस्टीका येथील अनाथ- निराधार गरजू विध्यार्थी शिक्षण साहित्या फळ वाटप , मास्क वाटप , जेवणाचे किट देवून  गुरुवार  दिनांक ०८ जुलै रोजी घोडेगाव येथे समाजउपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस  साजरा करण्यात आला.


                    कोविड संकटात जीवाची पर्वा न करता समाजा करिता लढणारे , डॉक्टर , नर्स परिचर, अशा सेविका पोलीस स्टाफ, पत्रकार , समाजसेवक अशा कोविड योध्याचा सन्मान
तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे या हेतूने वृक्षारोपणही  करण्यात आले असा अगळा वेगळा सामाजिक कार्यक्रम राबवत राज्यमंत्री साहेब  बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.


          या वेळी घोडेगावचे पोलिस उपनिरिक्षक लहु  शिंगाडे व घोडेगाव स्टाफ ,घोडेगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक नंदू वनवे,डॉ.प्रताप चिंचोलीकर ,डॉ.हेमंत गाढवे, मल्हार प्रतिष्ठान मंचरचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश आप्पा बाणखेले,आपला आवाजचे आंबेगाव ब्युरोचिफ  पत्रकार मोसीन काठेवाडी, होमगार्ड स्वप्नील कानडे, आदिपरिचारीका सांगडे मॅडम, तपस्वी मॅडम ,व इतर समाजसेवक अशा विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील कोरोना योध्दाचा सन्मान करुन प्रशस्तीपत्र देण्यात आले.


                    आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे पुणे जिल्हा संघटक नीरज भाऊ कडू आणि जिल्हाध्यक्ष ऍड श्री अनंतराव काळे साहेब यांच्या मार्गदर्शनात ,आंबेगाव तालुका अध्यक्ष श्री जितेंद्र भालेराव तसेच आंबेगाव तालुका कार्यध्यक्ष श्री दिगंबर ( मामा )कातळे यांच्या नेतृत्वात बच्चू भाऊ यांच्या विचारला प्रेरित होऊन अन्न वस्त्र, निवारा हा गरजवंतांना मिळावा या हेतूने घोडेगाव मधील सह्याद्री आदिवासी अनाथ निराधार मुलां सोबत  व गरजवंत शेतकरी सोनू शिंदे यांना घरावरील पत्रे भेट देण्यात आले.

Advertise


                     या प्रसंगी खेड तालुका कार्यध्यक्ष श्री सुनील भाऊ जाधव , शिरूर तालुका अध्यक्ष मा .श्री बापू नवले , मा.श्री राहुलदादा वाडके शिरूर तालुका ,तसेच वाहतूक आघाडी अध्यक्ष मा श्री विजयराव खडके सह्यादी आदिवासी विकास प्रतिष्ठन अनाथ ,निराधार मुलाचे वसतिगृह प्रमुख श्री विलास पंधारे सर , वैशाली पंधारे मॅडम जेष्ठ नागरिक विचारमंच आंबेगाव तालुका ग्रामस्थ ,जितु भाऊ मित्र परिवार आणि दिगंबर मामा कातळे मित्र परिवार, स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *