महापालिकेच्या वतीने अडीच हजारांपेक्षा अधिक बालकांना गोवर-रुबेला लसीकरण

०९ डिसेंबर २०२२

पिंपरी


शहरामध्ये गोवरचे बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आत्तापर्यंत २ हजार ५३८ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले आहे. तर, २० हजार ५६२ बालकांना ‘व्हिटॅमिन ए’ची मात्रा देण्यात आली आहे.

शहरामध्ये कुदळवाडी भागात गोवरचे बाधित रुग्ण आढळले होते. ८ संशयित रुग्णांपैकी ५ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका वैद्यकीय विभागाकडून गोवर लसीकरण आणि पाच वर्षांखालील बालकांचे सर्वेक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. आत्तापर्यंत ५ वर्षांखालील ३६ हजार ४३५ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *