निलम शिवराज लांडगे यांचे अनोखे रक्षाबंधन

११ ऑगस्ट २०२२
पिंपरी चिंचवड


संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस बांधव हे कर्तव्य बजावत असतात. आपल्या परिवारापासून दूर कर्तव्य पार पाडत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पोलीस बांधव यांना इंद्रायणी महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा निलम लांडगे व भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने राखी बांधून हा रक्षाबंधनचा सण साजरा केला.

इंद्रायणी महिला प्रतिष्ठान व भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम

शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कार्यरत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पाश्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी पोलीसांनी विशेष उपाययोजना कराव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी भाजपा युवा मोर्चाच्या पुजा अल्हाट, मुक्ता गोसावी, नंदिनी गावडे, सौ. पांचाळ व इतर भगिनी उपस्थित होत्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *