मंदोस चक्रीवादळाचं महाराष्ट्रावर संकट, हवामान खात्याने दिला पावसाचा इशारा

०९ डिसेंबर २०२२


मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र निर्माण होत आता या क्षेत्राचे रुपांतर आता चक्रीवादळात झाले आहे. हवामान विभागाने याला मंदोस चक्रीवादळ असं नाव दिलंय. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास ते ८५ किमी प्रतितास राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मंदोस चक्रीवादळ हे दक्षिण-पश्चिम आखातावर चक्रीवादळ सरकत आहे. त्यामुळं चेन्नई आणि शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना देखील बसणार आहे.

राज्यात मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरामध्ये १२ डिसेंबर रोजी अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मंदोस चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १२, १३, १४ आणि १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *