उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू

०९ डिसेंबर २०२२


उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या बेहिशेबी मालमत्तेची प्राथमिक चौकशी मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. पीओडब्लु याबाबत चौकशी करत आहे. गौरी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून तक्रात केली आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांची संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. याबाबत रीतसर चौकशीची मागणी करणारे पत्र आमच्याकडे आले आणि आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली असल्याची माहिती राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे. हायकोर्टाने याची नोंद घेतली आहे.

परंतु गौरी भिडे यांची याचिका सुनावणीसाठी घ्यायची की नाही यासंदर्भातला निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. त्याचबरोबर ठाकरे यांनी या याचिकेवर आक्षेप घेतला आहे. तर ही याचिका राजकीय वैमनस्यातून दाखल केली असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तर यासंबधी न्यायालय काय भूमिका देतं याकडे सर्वांचं लक्ष्य असणार आहे. परंतु मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी सुरू केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *