खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्ती, संस्थांचा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते बुधवारी गौरव

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१५ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संसदरत्न खासदार श्रीरंग  बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा उद्या (बुधवारी) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री सचिन अहिर, सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते सन्मान होणार आहे.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी (दि.16) सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.  याबाबतची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. खासदार श्रीरंग बारणे यांचा बुधवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मागील चार दिवसांपासून विविध कार्यक्रम होत आहेत. रोजगार मेळावा, भव्य आरोग्य शिबिर पार पडले.

 ‘या’ आदर्श व्यक्ती, संस्थांचा होणार सन्मान

शहरातील लोकाभिमुख कर्तव्य संपन्न, आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा उद्या गौरव केला जाणार आहे. वारकरी भूषण पुरस्काराने ह.भ.प बंडोपत शेळके, ह.भ.प महादेव भुजबळ, आधार भुषण पुरस्काराने कष्टकरी संघटनेचे बाबा कांबळे, सेवा भुषण पुरस्काराने वृद्धाश्रम चालविणा-या डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य, क्रीडा शिक्षक पुरस्काराने बन्सी आठवे, कामगार भूषण पुरस्काराने किशोर ढोकळे, सौंदर्यवती पुरस्काराने  पुनम डायडेम, स्वामी भुषण पुरस्काराने शिवतेजनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरी शेळके, शौर्य पुरस्काराने  धनश्री जाधव, समाजभुषण पुरस्काराने आपला परिवाराचे एस.आर.शिंदे, पोलीस मित्र भुषण पुरस्काराने  गजानन चिंचवडे, क्रीडा भुषण पुरस्काराने  आयपीएलमध्ये पहिला शतक करणारा सांगवीतील ऋतुराज गायकवाड, समाज भुषण पुरस्काराने  मंदार देव महाराज, क्रीडा पुरस्काराने  सायकलिंग करणारे बाबा भोईर, भुषण पुरस्काराने  भाऊसाहेब कोकाटे, स्वामी भुषण पुरस्काराने  स्वामी समर्थ मंडळ, निसर्ग भुषण पुरस्काराने  जग्गनाथ जरग वृक्ष मित्र, वृक्ष संवर्धन, कर्तव्य भूषण पुरस्काराने  वाकड ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, आदर्श भुषण पुरस्काराने ग्रीन्स सोसायटी, पर्यावण भुषण पुरस्काराने जगन्नाथ वैद्य, धन्वंतरी भुषण पुरस्काराने डॉ. सुधीर भालेराव, आदर्श सोसायटी पुरस्काराने पार्क स्ट्रीट सोसायटी आणि उद्योग भुषण पुरस्काराने संतोष बारणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *