रांका ज्वेलर्स च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त महिलांचा सन्मान

पिंपरी-चिंचवड
२८ सप्टेंबर २०२२


सोमवार दि.२६ सप्टेंबर पासून शारदा नवरात्र उत्सवास सुरूवात झाली असून पहिल्या माळेच्या दिवशी पांढरा रंग असल्याने रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने डाॅक्टर महिलांचा सन्मान करण्यात आला.
रांका ज्वेलर्स गेले अनेक वर्षे सोने चांदीच्या व्यवसायात आहे.या व्यवसायात त्यांनी अनेक ग्राहकांची मने जिंकून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.व्यवसाय करत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेने रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड शोरूम यांच्या वतीने नेहमीच सामाजिक उपक्रम राबविला जात असतात.त्याचा एक भाग म्हणून शारदा नवरात्र उत्सवा निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील डाॅक्टर महिलांचा आज सन्मान करण्यात आला.


नवरात्र उत्सवात नऊ दिवस प्रत्येक दिवसाच्या कलर प्रमाणे समाजात उल्लेखनीय कामगिरी करणा-या महिलांचा रांका ज्वेलर्स पिंपरी-चिंचवड शोरूम यांच्या वतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहीती आशा रांका यांनी दिली.सदर उपक्रमात आपला आवाज आपली सखी च्या संचालिका संगीता तरडे यांचे मोलाचे योगदान लाभले असेही आशा रांका यांनी सांगीतले.डाॅक्टर महिलांचा सन्मान आशा रांका व तेजपाल रांका यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ. लिना बोरूडे
डॉ.वैदेही जंजाळे
डॉ.ज्योती सलगरकर
डॉ.मीनल दीपक लाड
डॉ.अर्चना रविंद्र साळवे
डॉ.भारती पाटील
डॉ.मानसी सोनगिरकर बोराडे
डॉ.प्रज्ञा डोळे
डॉ.प्रज्ञा खोसे
डॉ.संगिता गायकवाड
डॉ.सिमा शेडगे
डॉ. रश्मी केदारनाथ कल्याणपुरे
डॉ. नेहा रोकडे
डॉ. शुभदा जोशी
डॉ.वैशाली पाटील
डॉ.प्रतिभा कर्चे
डॉ.शितल यादव
डॉ. पल्लवी घोलप
डॉ.पल्लवी प्रसाद
डॉ. सरोज राउत अबिंके
डॉ.रचना जस्वाल
डॉ. अमृता घोरपडे


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *