स्वच्छतागृह स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले

०७ डिसेंबर २०२२


महापालिकेच्या डुडुळगाव शाळेत स्वच्छतागृह स्वच्छ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून रखडले आहे. परिणामी संबंधित कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत . मात्र , महापालिका प्रशासनाकडून ठेकेदारांवर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे . महापालिकेत कायमस्वरूपी असलेले एक हजार सातशे सफाई कर्मचारी तर कंत्राटी तत्त्वावर एक हजार ५२ ९ कर्मचारी कार्यरत आहेत . महापालिकेकडे कंत्राटी आणि कायम सफाई कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता होत असते.

शहराची झाडलोट करणे , गटार काढणे , कचरा उचल करणे आणि कंपोस्ट डेपोवरील कचरा प्रक्रिया आदी कामांची जबाबदारी कंत्राटी पद्धतीने सोपवली आहे . काही स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक शाळांवर केलेली आहे . या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शाळेची स्वच्छता राखली जाते. सात ठेकेदारांच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचारी पुरविले जातात . या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ईएसआय , पीएफ व किमान वेतन दिले जात नसल्याच्या अनेक तक्रारी या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून महापालिका प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे नव्याने काढलेल्या निविदांमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना या सुविधा पुरविण्यासह कर्मचाऱ्यांची ‘ बायोमेट्रीक ‘ हजेरी असण्याचा नियम , अटी व शर्तीमध्ये समावेश करण्यात आला . त्रस्त कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की , ” गेल्या तीन महिन्यांपासून आम्हाला वेतन मिळाले नाही . आम्ही संसार कसा चालवायचा . ठेकेदारांकडून उडवाउडवीची उत्तरे ऐकायला मिळतात . आमचा पगार वेळेवर मिळावा , हीच अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *