भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील होणारे अपघात योग्य ते उपाययोजना करून लवकरात लवकर थांबवा – सचिन चिखले,मनसे नगरसेवक

रोहित खर्गे
विभागीय संपादक

निगडी – दि ३० जुलै २०२१
भक्ती-शक्ती चौकामध्ये आता नव्याने ग्रेड सेपरेटर – उड्डाणपुलाचे काम करण्यात आले व वाहतुक सुरू करण्यात आली, पण आजही एका व्यक्तीचा अपघाती निधन झाले.

मागील एक महिन्यापासून वाहतूक सुरू करण्यात आली वाहतूक सुरू झाल्यापासून अपघातामुळे आत्तापर्यंत तीन जण मृत्युमुखी, सहा जण अपंग झालेले आहेत अजूनही कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो.


या पुलावर लवकरात लवकर आपली व वाहतूक पोलीस, पालिका अधिकारी वर्ग, यांची पाहणी व्हावी व त्या ठिकाणी लवकरात लवकर उपाययोजना करावी. नाहीतर अजूनही नाहक नागरिकांचे बळी जातील याला जबाबदार ?

असा सवाल सचिन चिखले यांनी केला.
यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

📍दर महत्वाच्या वळणावर व रोटरी पुलावर रर्मलर बसविण्यात यावे.

📍 योग्य त्या ठिकाणी दिशादर्शक लावण्यात यावेत, एकेरी वाहतूक करत असताना नागरिकांना कळतील असे स्पष्ट फलक लावण्यात यावे.

📍 ट्रान्सपोर्ट नगरी पासून येणाऱ्या रस्त्याजवळ योग्य स्पीड ब्रेकर लावून दिशादर्शक फलक लावण्यात यावे.

या सगळ्या बाबींकडे आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे व राहिलेले अपूर्ण काम पूर्ण करून घेण्यात यावे. असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व महापौर माई ढोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *