राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया गांधींचा सहभाग

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ ऑक्टोबर २०२२


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत असलेला राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर, सोनिया व राहुल गांधी यांच्या एकत्रित सहभागाचा कर्नाटकसह अन्य राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती लाभ होऊ शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेकडे भाजपलाही लक्ष द्यावे लागले असून ‘यात्रेमध्ये सोनिया फक्त अर्धा तास सहभागी झाल्या होत्या, या यात्रेमुळे निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, केंद्रातील भाजपचे नेतेही करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात्रा काढून काँग्रेस घाम गाळत असल्याचे दिसत असले तरी, त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाही,’ असा दावा भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी केला.

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मंडय़ा जिल्ह्यातून यात्रा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजता सोनिया गांधी यात्रेमध्ये सहभागी झाल्या. यात्रेमध्ये सोनिया गांधी अर्धा तास सहभागी होणार होत्या; पण त्यांनी दोन तास पदयात्रा केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *