मुळा नदीवर सांगवी – दापोडी येथे नविन पूल उभारणार – ॲड. नितीन लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि. ११ ऑगस्ट २०२१
मुळा नदीवर सांगवी – दापोडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नविन पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे सांगवी, दापोडी, बोपोडी परिसरातील नागरीकांची सोय होणार असून पुणे – मुंबई महामार्गावरील विशेषता बोपोडी चौकातील वाहतुकीचा ताण कमी होईल. या पूलाच्या विषयी प्रसिध्द झालेल्या निविदा प्रक्रियेत मे. टी. ॲण्ड टी. इन्फ्रा लि. यांची 30,99,00000/- रुपयांची (तीस कोटी नव्यान्नव लाख रुपये) लघुतम निविदा प्राप्त झाली होती. या विषयीचा ठराव बुधवारी (दि. ११ ऑगस्ट) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीस पास करण्यात आला अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.
सांगवी – बोपोडी येथे मुळा नदीवर नवीन पूल उभारण्यासाठी स्थापत्य विभागाकडून 40,80,07376/- रुपयांची (चाळीस कोटी एैंशी लाख सात हजार तीनशे शह्यात्तर रुपये) निविदा प्रसिध्द करण्यात आली होती. निश्चित केलेल्या मुदतीत नऊ कंपन्यांनी आपल्या निविदा सादर केल्या. यामध्ये टी. ॲण्ड टी. इन्फ्रा. लि. या कंपनीने लघुतम निविदा भरल्यामुळे त्यांची निविदा मंजूर करण्यात आली अशीही माहिती पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *