पिंपरी दि २४ फेब्रुवारी २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील तसेच अतिरिक्त आयुक्तपदी पदभार घेतलेले क्रमांक १ चे विकास ढाकणे आणि अतिरिक्त आयुक्त क्रमांक ३ चे नगरसचिव उल्हास जगताप यांचा सत्कार पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आला.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांची नुकतीच बदली झाली आणि त्यांच्या जागी बदली होऊन राजेश पाटील यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. तर श्रेणी मानांकनानुसार तीन अतिरिक्त आयुक्त पदे आहेत. त्यापैकी दुसऱ्या क्रमांकावर अजित पवार हे कार्यरत आहेत. तर क्रमांक एक साठी विकास ढाकणे व क्रमांक तीन साठी महानगरपालिका सेवेतील स्थानीक अधिकारी, नगरसचिव उल्हास जगताप यांची नियुक्ती आयुक्त राजेश पाटील यांनी नुकतीच केली आहे. यानिमित्त पत्रकार संघाकडून आयुक्त आणि अतिरीक्त आयुक्त यांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी पत्रकार संघाचे पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, उपाध्यक्ष प्रविण शिर्के, तुळशीदास शिंदे, मा. अध्यक्ष जेष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के, मा. अध्यक्ष बाळासाहेब ढसाळ, पत्रकार हल्ला कृती समिती सदस्य अनिल भालेराव, जेष्ठ पत्रकार नाना कांबळे, रोहित खर्गे, मारुती बाणेवार, दिनेश दुधाळे, विश्वजित पाटील, सुनील कांबळे, दत्ता कांबळे, विनय लोंढे आदी सदस्य उपस्थित होते.
भोसरीचा समाधान दगडे आणि आकुर्डीचा संकेत चव्हाण यांची महाराष्ट्र केसरीसाठी निवड
रोहित खर्गेविभागीय संपादक पिंपरी (दि. 24 फेब्रुवारी 2021) कै. वस्ताद बाळासाहेब गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…