भाजप नेते, आणि पॅनेल मधील नगरसेवकांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा – चंदा लोखंडे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ फेब्रुवारी २०२२

पिंपरी 


भाजपचे नेते, प्रभागातील पॅनेलमधील स्थानिक नगरसेवकांनी पाच वर्षात प्रचंड त्रास दिला. कोणतीही कामे होऊ दिली नाहीत. या त्रासाला कंटाळून भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा दिला असल्याचे यांनी सांगितले. तसेच लवकरच आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चंदा राजू लोखंडे - नगरसेविका, पिं.चिं. मनपा
चंदा राजू लोखंडे – नगरसेविका, पिं.चिं. मनपा

पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक २९ चे महापालिकेत प्रतिनिधीत्व करत असलेल्या चंदा लोखंडे यांनी आज (सोमवारी) आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेविकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका  मांडली.लोखंडे म्हणाल्या, ”पिंपळेगुरव, वैदुवस्ती भागातून मी  निवडून आले होते. निवडून आल्यानंतर प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविताना अनंत अडचणी आणल्या. जाणुनबुजून त्रास दिला. नागरिकांच्या समस्या सोडवू दिल्या नाहीत. प्रभागातील विकास कामे करताना हेतुपुरस्सर आडकाठी आणली. कामे करताना मोकळीक दिली नाही”.

भाजपचे नेते, प्रभागातील स्थानिक नगरसेवकांनी पाच वर्षात प्रचंड त्रास दिला. कोणतीही कामे होऊ दिली नाहीत. विविध अडचणी आमच्यासमोर उभ्या केल्या. त्रास असाह्य झाला होता. या त्रासाला कंटाळून आज भाजप नगरसेविकापदाचा राजीनामा दिला आहे. लवकरच आपली पुढची भूमिका स्पष्ट केली जाईल असेही त्यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *