मंचर ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलातील दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसान…

मंचर ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळा क्र.२३ मधील शु वर्ल्ड या चपलेच्या दुकानाला काल रात्री अचानक आग लागल्या मूळे दुकानातील सर्व फर्निचर व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून अंदाजे ३२ लाखांचे मोठे नुकसान झाल्याचे दुकानाचे मालक अतुल निघोट यांनी सांगितले.


याबाबत माहिती अशी, सदर घटना उशिरा रात्री 2 च्या दरम्यान घडली दुकानातून धुराचे लोट येताना पाहून समोरील हाराच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी मंचर गावचे उपसरपंच युवराज बाणखेले यांना फोन करून कळवले असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळताच त्यांनी ही घटनास्थळी येऊन ग्रामपंचायतीच्या दोन टँकर ने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून मंचर पोलीस स्टेशन च्या पी. एस. आय. अपर्णा जाधव यांनी राजगुरूनगर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाला फोन करून कळवले असता अग्निशमन बंब आल्यावर ही आग आटोक्यात आणण्यात पहाटे 5 वाजता यश आले यावेळी माजी सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामपंचायत सदस्य शाम थोरात, अरुणनाना बाणखेले, सतीश बाणखेले, मंचर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.कोरे साहेब, सोमनाथ वाफगावकर याठिकाणी उपस्थित होते यावेळी नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बाळू लोंढे, दिलीप थोरात, रमेश डिंगोरकर व इतरांनी सदर दुकानातील आग विझवणे कामी प्रयत्न करून अग्निशमन च्या कर्मचाऱ्यांना मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *