राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा – संभाजीराजे छत्रपती

१९ नोव्हेंबर २०२२


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

राज्यपाल असं का बडतात मला माहीत नाही. त्यांना महाराष्ट्रातून पाठवून द्या, असं मी परवा सुद्धा म्हटलं होतं. मी पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो, प्लीज प्लीज अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. शिवाजी महाराज असतील इतर महापुरुष असतील संत असतील यांच्याबाबत घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात? असा सवाल संभाजी छत्रपती यांनी केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *