जुन्नर तालुक्यात २६ ग्रामपंचायत व १५ गावच्या पोटनिवडणुकी रंगणार

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
जुन्नर/ नारायणगाव
जुन्नर तालुक्यातील येत्या पाच नोव्हेंबर रोजी २६ ग्रामपंचायतच्या व १५ गावच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार, पॅनल प्रमुख व कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.
नारायणगाव सह बेल्हे वडगाव आनंद कांदळी धालेवाडी बारव गुंजाळवाडी वैष्णोधाम पारुंडे यासह २६ ग्रामपंचायत च्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जुन्नर पंचायत समिती कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. सहा नोव्हेंबर रोजी निकाल लागणार असून आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समिती कार्यालयात उमेदवार त्यांचे पॅनल प्रमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *