संकट काळात समाज पुन्हा उभा करण्यासाठी रोजगाराची गरज – रुपालीताई चाकणकर

राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या प्रयत्नातून तरुणांना रोजगार

भव्य नोकरी महोत्सवात तीन हजारांहून अधिक तरुणांचा सहभाग

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : देशाची प्रगती तरुणांच्या प्रगतीवर अवलंबून असते. ज्या पध्दतीने शिक्षण घेतलं. त्या पध्दतीने त्याला नोकरी मिळाली पाहिजे. संकट काळात लाखो तरुणांचा रोजगार केला. अनेक परिवारापुढे आर्थिक समस्या आहेत. या संकटाच्या घडीला तरुणांना, समाजाला पुन्हा उभा करण्यासाठी रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने घर सावरण्यासाठी दिलेल्या हातभारामुळे आयुष्यभरासाठी या तरुणांना पाठबळ मिळणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या वतीने कै. भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून पिंपरी वाघेरे येथील रयत संकुलात भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन, तसेच नोकरी मिळवून देण्यासाठी जॉब कार्डचे वाटप रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, हनुमंत गावडे, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, शिक्षण मंडळ माजी सभापती विजय लोखंडे, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप, पदवीधर सेल शहराध्यक्ष माधव पाटील, लीगल सेल अॅड. गोरक्ष लोखंडे, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे, कविता खराडे, मनिषा गटकळ, संगिता कोकणे, अण्णा कापसे, गोरोबा गुजर, उषा चिंचवडे, सुजाता विचकर, ज्योति निंबाळकर, सुवर्णा वाळके, शबाना पठाण, शुक्रुला पठाण, जॉब शोकेस स्मीया शेख, श्रीराम सातपुते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

रुपालीताई चाकणकर पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या लाटेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. युवा वर्गावर बेरोजगारीची वेळ आली. उद्योगधंदे व्यवसाय ठप्प झाले. आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. दोन कोटी रोजगाराचे आश्वासन कोणीतरी दिलं होतं. आज विरोधकांची नावे घ्यायची नाहीत. परंतु, मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झालेत. या २ हजार ५५५ दिवसांचा लेखाजोखा मांडवा लागतो. त्यांचे दोन कोटी रोजगार कोणाला मिळाले नाहीत. उलट देशात १४ लाख लोक बेरोजगार झाले. महागाईचा प्रश्न महिलांसमोर आ वासून उभा आहे. समाजाच्या या वेदना त्यांच्या वतीने मांडण्याची गरज आहे. देशाची प्रगती युवकांच्या प्रगतीवर अवलंबून असते. ज्या पध्दतीने शिक्षण घेतलं. त्या पध्दतीने त्याला नोकरी मिळाली पाहिजे. या नोकरी महोत्सवाच्या निमित्ताने घर सावरण्यासाठी, आयुष्यभरासाठी त्याला पाठबळ देण्याचे काम संजोग वाघेरे व उषा वाघेरे यांच्या माध्यमातून झाले. हा अतिशय चांगला उपक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राबविला गेला. समाजासाठी अशा कामाची गरज आहे. जॉब कार्डमुळे तरुणांना रोजगार मिळेपर्यंत पाठपुरावा करणे, हा देखील स्त्युत्य उपक्रम आहे.

पुण्याचे शिल्पकार म्हणून फलक लागल्या नेत्यांना चे ते फलक लागले. त्यांना वाढदिवसानिमि्त दिर्घायुष्य लाभो आणि प्रभावी विरोधी पक्षनेते राहावे, या शुभेच्छा आहेत. पण, शिल्पकार नवीन गोष्टींची निर्मिती करत असतो. लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादांनी पुणे, पिंपरी-चिंचवडची नवनिर्मिती केली. त्यांच्या विकासामुळे राज्यात, देशात आपल्याला ओळख झाली. आम्हाला २०१७ ला झाली. तुम्हाला नागपूरच्या बाहेर कोणी ओळखत नव्हतं. तेव्हा आम्ही प्रगतीपथावर होतो. इथे सत्तेवर आल्यापासून दयनीय अवस्था झाली. कोरोनाच्या महामारीत जबादारी ढकलून ज्यांनी हात वर केले, त्यांनी शिल्पकार म्हणून घेऊ नये. आयत्या विकासाच्या कामावर रेघोड्या मारणं सोपं असतं. ते शिल्पकाराला जमणार नाही. तो बुरखा पांघरु नये. ज्याचे श्रेय त्यालाच द्यावे. पुढची आढावा बैठक राष्ट्रवादीच्या महापौरांच्या कक्षात होईल. दोन आकड्यांवरून तीन आकड्यांवर जाणं कठीण नाही, असंही रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

Advertise

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली शहराचा विकास करताना, चांगले प्रकल्प राबवित असताना प्रत्येक घटकाला उभं करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कायम असते. कोरोना महामारीत अनेक तरुणांचा रोजगार गेला. रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली पाहिजे. ही अजितदादांची दूरदृष्टी समोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा नोकरी महोत्सव घेण्यात आला. या नोकरी महोत्सवात ऑनलाईन २ हजार, तर ऑफलाईन १ हजार अशा सुमारे ३ हजारांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतलेला आहे. तर नामवंत ४५ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांना मिळाला नाही. त्यांनाही जॉब कार्डच्या माध्यमातून रोजगार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.

प्रा. संजय मेस्त्री व दीपक साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *