बेळगाव कोर्टाच्या समन्सला वकील उत्तर देणार – संजय राऊत

३० नोव्हेंबर २०२२


कर्नाटक न्यायालय समन्सला माझे वकील उत्तर देतील. मी उद्याच्या सुनावणीला उपस्थित राहणार नाही. पुढच्या सुनावणीला मी जाईल, असं खासदार संजय राऊत म्हणालेत. कर्नाटक सीमावादावर सुनावणी झाली तर होईल. आम्ही सगळेच या सुनावणीची वाट पाहातोय. कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीला ठाण मांडून बसलेले आहेत. आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? हा मोठा प्रश्न आहे, असं म्हणत कर्नाटक सीमाप्रश्नी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

30 मार्च 2018 ला संजय राऊतांनी कर्नाटकात भाषण केलं होतं. हे भाषण प्रक्षोभक असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी राऊत यांना समन्स बजावण्यात आलं आहे. 1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर बोलताना राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नसल्याचं म्हटलंय.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *