राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना गेल्या 3 दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना आज मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. कार्यकर्त्यांनी हॉस्पिटल परिसरात गर्दी करू नये असं आवाहन भुजबळ यांच्याकडून करण्यात आलं आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *