जुन्नर तालुक्यात दोन दिवसांत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ

रामदास सांगळे
विभागीय संपादक
०८ जानेवारी २०२२

बेल्हे


दोन दिवसात जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढत असून नागरिकांनी काळजी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जुन्नर तालुक्यात शनिवार (दि.८) रोजी ६१ रुग्ण तर शुक्रवार (दि ७) रोजी ६३ रुग्ण आढळून आले.मोठया प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क शिवाय कोणीही बाहेर पडू नये तसेच सॅनीटायझर व सोशल डिस्टन्स राखण्याचे आवाहन आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले आहे. शनिवार दि.८ रोजी तालुक्यात ६१ रुग्ण खालील गावांमध्ये आढळून आले.

नारायणगाव १५, वारूळवाडी ६,ओतूर ५,आळेफाटा ४,राजुरी ३,आर्वी गुंजाळवाडी ३,आळे २,धोलवड २, उंब्रज नंबर-१ रुग्ण २, कांदळी २,वडज २, तसेच बारव,आणे,गुळुंचवाडी,भिवाडे खुर्द,खुबी,केवाडी, पारगाव तर्फे आळे, हिरवे तर्फे नारायणगाव, येडगाव, पिंपळवंडी , बोरी बुद्रुक,त खानापूर,धामणखेल, शिरोली बुद्रुक या गावांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *