पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची मुंबईला बदली, राष्ट्रपती पदक विजेते अंकुश शिंदे नवे आयुक्त

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ एप्रिल २०२२

पिंपरी-चिंचवड


पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांची बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षक व्हीआयपी सुरक्षा, महाराष्ट्र राज्य या पदावर मुंबई येथे तडकाफडकी बदली झाली.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून ५ सप्टेंबर २०२० रोजी तिसरे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खूप बदल करत चांगले काम करवून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना मर्जीच्या ठिकाणी बदल्या दिल्या. पदभार स्वीकारल्याबरोबर शहरातील नागरिक आणि सामाजिक संस्थांची बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर निर्णय घेऊन कारवाया केल्या. त्यांच्या कार्यकाळात चुकीच्या पद्धतीने माथाडी च्या माध्यमातून कंपन्यांना दादागिरी करून लुटणाऱ्यांवर चाप बसवून कंपन्याना दिलासा दिला. जुगार , मटका , गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

वेषांतर करून केलेल्या कारवायांचे शहरातील नागरिकांनी कौतुक केले. त्यांना कौतुक केलेले नेहमीच आवडले. त्यांना मीडियामध्ये राहणे आवडत असे. त्यांच्या धडकेबाज कारवाई आणि कोयताकिंग, तलवारीने केक कापणार्या, गुंडगिरी करणारे, मुलींची छेडछाड करणारे भुरट्यांची गुंडा स्कॉडकडून धिंड काढली यामुळे भुरट्यावर वचक बसली होती. त्यांची मिशीवर ताव आणि दोन्ही हात बांधून फोटो काढण्यासाठी ची छबी खूप प्रसिद्ध झाली होती त्याची चक्क कॉपी करताना नागरिक दिसत होते.ते कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेले आणि त्या ठिकाणी एखादे सेलिब्रिटी असे तेथेही सेलिब्रिटिपेक्षाही जास्त गर्दी सेल्फी घेण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला दिसत असे. त्यांची जमेची बाजू म्हणजे त्यांचे प्रत्येक भाषेवर असलेले प्रभुत्व. भाषण करताना उर्दू, हिंदीचा आणि शेर शायरी चा वापर ते समर्पकपणे करत असे. त्यांच्या अनेक धडकेबाज कारवायांचे शहरभर कौतुक झाले. पण चाकण च्या कारवाई च्या संमिश्र चर्चा होत्या. गुन्हेगारांच्या अंगावर झाड फेकून झडप घालून पकडले याबाबत उलटसुलट चर्चा झाल्या.

कृष्ण प्रकाश यांच्या जागी मुंबई येथील सुधार सेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकुश शिंदे यांची बदली झाली आहे. ३० वर्ष्याच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात काम।केले आहे. आदिवासींच्या हितासाठी ऐतिहासिक यश मिळवून महाराष्ट्रातील आदिवासी भागात डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांच्या विरोधात लढा देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. संप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी आपल्या कामाचा प्रभाव निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांनी भिवंडी, मालेगाव आणि नाशिक सारख्या भागात कायदा आणि सुवेवस्थेच्या अनेक समस्या हाताळल्या आहेत. अंतर्गत सुरक्षा आणि कठोर कर्तव्य पदकांसह अनेक पुरस्कारांसह ते राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्तकर्ते आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *