पीएमपी प्रशासनाकडून महिलांकरिता जादा बसेस सोडण्याचा निर्णय

०७ नोव्हेंबर २०२२

पुणे


महिलांना गर्दीच्या वेळी पीएमपी बसमधून प्रवास करताना त्रास होतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने महिलांकरिता दहा जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार (दि.०७ नोव्हेंबर) पासून या १० जास्त बस शहरातील गर्दीच्या मार्गांवर फक्त महिलांकरिता धावतील. महिलांना बसमधून सुरक्षित प्रवास करता यावा, याकरिता जादा १० बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमपीची यापूर्वी शहरात तेजस्विनी ही महिला विशेष बस सुरू आहे. पीएमपी प्रशासनाकडून तेजस्विनी या महिला बससेवेव्यतिरिक्त जादा 10 महिला विशेष बस गर्दीच्या वेळी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *