पुण्यात लाच घेताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांना पकडले

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


एका घड्याळ चोरीच्या प्रकरणात अल्पवयीन मुलांना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अटक न करण्यासाठी तब्बल 25 हजारांची लाच मागणाऱ्या चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.

तक्रारदार यांच्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलावर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी, तसेच प्रकरण मिटवण्यासाठी दोघेही कर्मचारी तक्रारदार यांच्याकडे 25 हजारांच्या लाचेची मागणी करत होते. परंतु तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे धाव घेतली होती. रविवारी चतु:श्रृंगी वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर सापळा रचण्यात आला. त्यात दोघा पोलिसांना लाच घेताना पकडले. त्यावेळी आणखी दोघेजण तेथे होते. त्यामुळे या लाच प्रकरणात त्यांचा संबंध आहे का, याची पडताळणी रात्री उशिरापर्यंत करण्यात येत होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *