महापालिकेच्या वतीने क्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त महापौरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. ७ सप्टेंबर २०२१ 

राजे उमाजी नाईक हे इंग्रजी सत्तेविरुध्द लढणारे थोर क्रांतिकारक आणि प्रखर देशभक्त होते असे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त  महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात त्यांचे प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्या अनुराधा गोरखे, उप आयुक्त सुभाष इंगळे, माहिती जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, जय मल्हार क्रांती संघटना पिंपरी चिंचवड शहराचे पदाधिकारी सुभाष जाधव, शेखर गोरगले, सुरेश चव्हाण, शांताराम गोफणे, रविंद्र रोडे, संजय रोडे, आशिष जाधव, दिपा तटले उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूशी सामना करुन राजे उमाजींनी त्यांना जेरीस आणले होते.  उमाजींनी स्वत:ची मोठी फौजच इंग्रजाविरुध्दच्या लढ्यात तयार केली होती.  त्यामध्ये गुप्तहेर, योध्दे, विविध कला निपुण अशा व्यक्तींचा समावेश होता.  अशा पराक्रमी योध्द्यांमुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे असेही महापौर माई ढोरे यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *