आम्हाला निवडणुकांची भीती नाही – एकनाथ शिंदे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे.

आम्हाला निवडणुकांची भीती नाही. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही,असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात? अशी विचारणाही त्यांनी केली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत. आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे. काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे. आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असा दावा एकनाथ शिंदेंनी केला. अडीच वर्षानंतर जनता काम करुन देणाऱ्या लोकांनाच निवडून देणार आहे. तेव्हा आमच्या २०० हून अधिक जागा येतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *