डिंगोरे तंटामुक्ती अध्यक्षपदी उकिर्डे तर उपाध्यक्ष पदी आम्ले यांची निवड

दिपक मंडलिक
बातमी प्रतिनिधी
३० ऑगस्ट २०२२

डिंगोरे


डिंगोरे तालुका जुन्नर येथील महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी श्री संतोष शिवाजी उकिर्डे व उपाध्यक्षपदी श्री उल्हास मारुती आमले यांची एकमताने निवड करण्यात आली. डिंगोरे येथील श्रीराम मंदिरात सरपंच सौ. सीमाताई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली,यावेळी श्री उकिर्डे व आम्ले यांची निवड करण्यात आली,यावेळी विविध विकासकामांविषयी सर्वानुमते चर्चा करून ठराव संमत करण्यात आले,वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांना पत्र देण्यासंबंधी चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली.

या वेळी माजी जिल्हापरिषद सदस्य अंकुश आम्ले व बबन तांबे,विश्वास आम्ले,ग्रामविकास अधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते,या वेळी मावळते तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री राजेश सुकाळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष उकिर्डे यांचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *