रहाटणी येथे सांडपाणी वाहिनी तुंबण्याची समस्या

०७ नोव्हेंबर २०२२

रहाटणी


रहाटणी येथील भालेराव कॉलनीत सांडपाणी वाहिनी तुंबण्याची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले असून, यावर कायमची उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या कॉलनीत सुमारे ५० कुटुंब राहतात. त्यांचे दैनंदिन सांडपाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. मात्र, हे सांडपाणी पूर्णपणे सांडपाणी वाहिनीतून जात नाही. अनेकदा तुंबून राहते. कधीकधी चेंबरमधून रस्त्यावर पाणी येते तर रहिवाशांच्या घरातही तुंबते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. या बाबत सतत महापालिकेला तक्रार केली जाते. महापालिकेचे सफाई कामगार येऊन तात्पुरत्या स्वरूपात समस्या मिटतात. मात्र, काही दिवसांनी पुन्हा तीच समस्या. यामुळे रहिवासी पुरते हैराण झाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *