पिंपरी गावात गुटखा जप्त, गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या पिंपरी गावातील कारवाईत गुटखा जप्त केला. महावीर लिंबाराम भाटी (वय २५, रा. पिंपरीगाव, मूळ राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे. सतीश माळी (रा. सांगवी), धनसाराम (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी भाटी याने एक दुचाकी व दोन मोटारीमध्ये गुटखा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, सापळा लावून भाटी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन मोटारी, एक दुचाकी व गुटखा असा ११ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *