महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाचे नामकरण ‘सामान्य प्रशासन विभाग’

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासन विभागाचे नामकरण करण्यात आले आहे. आता प्रशासनाऐवजी ‘सामान्य प्रशासन विभाग’ असे संबोधण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. प्रशासन विभागाशी होणारा पत्रव्यवहार यापुढे ‘सामान्य प्रशासन विभाग’ या नावाने करण्यात येणार असून नागरिक तसेच पत्रव्यवहार करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महापालिकेतील विभागांसाठी विविध संवर्गातील पदे निर्माण करणे व महापालिकेच्या आकृतीबंधास राज्याच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. प्रशासन विभागाकरिता ‘सामान्य प्रशासन विभाग’ असा शब्दोल्लेख करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या अमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम, त्यासंबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव आदेशाचे अधिक्रमण करून महापालिकेतील विविध पदांवर करावयाच्या नियुक्तांचे नियमन, सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी सुधारित नियमांना शासनाने १८ फेब्रुवारी २०२० ला अधिसूचनेद्वारे मंजुरी दिलेली आहे. या आदेशाची अंमलबजावणी ३ नोव्हेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे. हा आदेश महापालिकेच्या सर्व विभागांना पाठविण्यात आला असून यापुढे अंतर्गत पत्रव्यवहार ‘सामान्य प्रशासन विभाग’ या नावाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *