माळशेज घाटात बस कर्मचाऱ्याची दरीत उडी मारून आत्महत्या

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०८ जून २०२२

माळशेज


कल्याण नगर महामार्गावर असणाऱ्या माळशेज घाटात आज एका इसमाने बस मधून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.गणपत मारुती इंदे राहणार भंडारदरा अकोले येथील हा रहिवासी असून अहमदनगर बस डेपो मधील अकोले-कल्याण या बसचा कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला असून  घटनेची माहिती समजताच टोकावडे पोलीस घटनास्थळी तात्काळ हजर होऊन आपत्ती व्यवस्थापन संघ जुन्नरचे माजी सैनिक रमेश खरमाळे, प्रशांत कबाडी यांच्या टीमच्या मदतीन मृत देह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी टोकावडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *