आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा – अजित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०५ नोव्हेंबर २०२२


अजित पवार यांनी पक्षाच्या शिर्डीतील शिबिरात बोलताना कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेसोबत जाण्याचा विचार करतोय. याबाबत प्रांतिक पातळीवर निर्णय कळविला जाईल. पण तोवर एकट्याने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असं अजित पवार कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्टपणे म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये आघाडीची वाट पाहत बसू नका. त्याबाबतचा निर्णय लवकरच होईल. मात्र तूम्ही कामाला लागा. आघाडीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वबळावर लढण्याची तयारी करा अशी महत्त्वाची सूचना अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.आपली ताकद स्थानिक पातळीवर दिसली तरच मित्र पक्ष आपल्यासोबत चर्चा करायला येतील असंदेखील अजित पवार म्हणाले. ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. आपल्या लोकांनाही काही सांगत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका”, असं आवाहन अजित पवारांनी केलंय. ज्या घरात वाढलो ते घर उद्ध्वस्त करणं योग्य नाही. असंही अजित पवार म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *