ऑनलाइन सट्टा प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई

नारायणगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी तीन मजली इमारतीत सुमारे ९० ते १०० जण चालवत होते सट्टा बाजार

नारायणगाव :- (किरण वाजगे)
ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छापा टाकून सुमारे ९० ते १०० जणांना ताब्यात घेतले आहे. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर ऑनलाइन बेटिंग ॲप ची पाळंमुळं पुणे जिल्ह्यातील नारायणगाव मध्ये सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. नारायणगावातील एका इमारतीत हे काम सुरु होते. संपुर्ण तीन मजली इमारत या सट्टेबाजीसाठी वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नारायणगावातील या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्हिजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स परिसरातील इमारती मध्ये असलेल्या सट्टा केंद्राला चौकशी निमित्त भेट दिली. असून त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सायबर क्राईम व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट…
दरम्यान नारायणगावातील मुख्य सूत्रधार ऋत्विक सुरेश कोठारी व जुन्नर येथील बोकरिया (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांच्यासह सुमारे ९० ते १०० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी सांगितली.
ही संपूर्ण सट्टेबाजी महादेव बेटिंग ॲप व लोटस ३६५ या ॲपद्वारे तसेच विविध वेबसाईट द्वारे बेटिंग घेतले जात होते. या प्रकरणी पैसे काढणे पैसे भरणे ही प्रक्रिया नारायणगाव येथे कॉल सेंटर अथवा बीपीओ सेंटर प्रमाणे सुरू होती या प्रकारामध्ये परराज्यातील युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असून याची पाळंमुळं किती खोलवर रूजली आहेत हे येत्या दोन-तीन दिवसांनी स्पष्ट होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *