आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल – अमोल मिटकरी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


जयंत पाटलांच्या वक्तव्यालानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आगामी काळात राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल असं वक्तव्य केलं आहे.

सध्याच्या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड रोष आहे. आज कार्तिकी एकादशी आहे. आषाढी आणि कार्तिकीची महापूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतात. पण येणाऱ्या आषाढीची शासकीय महापूजा महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करतील. आम्हाला विश्वास आहे की १०० च्यावर आमदार आम्ही निवडून आणू. आगामी काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल असे मिटकरी म्हणाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *