मुक्ताईनगरमध्ये सुषमा अंधारेंच्या सभेवर बंदी, अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०४ नोव्हेंबर २०२२


शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा पोहचली आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहे.धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना जिल्ह्यात बंदी घालण्यात आली होती. आता मुक्तानगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेस बंदी घातली आहे.

मुक्ताईनगर येथे आज ( ४ नोव्हेंबर ) शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पार पडणार होती. मात्र, कालच एका वक्तव्यामुळे शरद कोळी यांना जिल्ह्यात बंदी घातली होती. त्यानंतर आता मुक्तनगरमध्ये सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेला बंदी घालण्यात आली आहे. यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रेच्या सभेला आम्ही परवानगी मागितली आहे. ती मिळेल, असा विश्‍वास आहे. कोणीही सभेवर बंदी घालू शकत नाही. त्यामुळे महाप्रबोधन यात्रा पार पडणारच. सत्ताधारी दबावतंत्राचा वापर करत आहे,” असा आरोपही अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *